परभणी:आॅटो पलटी झाल्याने ७ प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:08 IST2019-04-20T00:07:53+5:302019-04-20T00:08:44+5:30
तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

परभणी:आॅटो पलटी झाल्याने ७ प्रवासी गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील करीम खॉ पठाण हे आपल्या परिवारासह खाजगी आॅटोरिक्षाने जवळा बाजारकडे शुक्रवारी निघाले होेते. तेव्हा भोगावपासून २ कि.मी. अंतरावरील जिंतूर-औंढा रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला आॅटो उतवित असताना पलटी झाला. यामध्ये ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये हिना बेगम करीम खॉन पठाण (वय २६) या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव होत होता. यांच्यावर जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. त्याच बरोबर करीम खॉन अकबर खॉन पठाण (वय ३०), अफसर खॉ अकबर खॉ पठाण (वय २८), शाहरुख अकबर खॉ पठाण (वय २९), शिवाजी चोखाजी सावंत (वय ३०), तब्बसूम (वय ५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.