परभणी : पावनखिंड मोहिमेत ५१ जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:49 AM2019-07-22T00:49:28+5:302019-07-22T00:50:12+5:30

स्वराज्य ट्रेकर्सच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत परभणीतील ५१ ट्रॅकर्सनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला़

Parbhani: 51 participants in Pavankhind campaign | परभणी : पावनखिंड मोहिमेत ५१ जणांचा सहभाग

परभणी : पावनखिंड मोहिमेत ५१ जणांचा सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वराज्य ट्रेकर्सच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत परभणीतील ५१ ट्रॅकर्सनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला़
इतिहासातील स्फूर्तीदायक घटनांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथे दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंतीचे आयोजन केले जाते़ शिवराष्ट्र हायकर्सचे प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी ही २७ वी मोहीम आयोजित केली होती़ त्यात परभणीच्या स्वराज्य ट्रेकर्स सोबत ५१ जणांनी सहभाग नोंदविला़ ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मार्गावरील पदभ्रमंतीच्या मार्गावरून वीरशिवा काशिद, बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू अशा शेकडो ज्ञात, अज्ञात मावळ्यांच्या बलीदानाचा इतिहास जागृत ठेवला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी उलगडत जाणारा शिवकालीन इतिहास तसेच बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरायांचा अखंड जयघोष करीत ट्रेकर्संनी पावनखिंडीचा परिसर दणाणून सोडला़ पावसाचा कहर, तुडूंब वाहणारे नदी, नाले, चिखलाचा रेपटा, धुक्याची धुलई अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत या मोहिमविरांनी पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती यशस्वी केली़ खा़ छत्रपती राजे संभाजी महाराज, कल्याणचे खा़ श्रीकांत शिंदे, शेतकरी नेते राजू शेट्टी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा दाखवून या मोहिमेला प्रारंभ झाला़
सरदारांच्या वंशजांच्या मार्गदर्शनामुळे मोहीमविरांमध्ये उर्जा निर्माण झाली़ शिव व्याख्याते दीपकराव कर्पे, भुपाल शेळके यांच्या व्याख्यानामुळे ट्रेकर्सना विचारांची शिदोरी मिळाली़ मोहिमेचे प्रमुख दिलीपराव भराडे, माधव यादव, राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सोळंके, माऊली रेंगे, धनंजय इक्कर, वैजनाथ रेंगे, व्यंकटेश शिंदे, श्यामसुंदर वाघमारे, श्यामराव पवार, प्रल्हाद गरड, श्याम गाडेकर, गजानन देशमुख, संदीप गवले, अविनाश पारवे, गजानन पवार, बापू शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते़

Web Title: Parbhani: 51 participants in Pavankhind campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.