शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

परभणी : शेवटच्या टप्प्यात ४३ टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:38 IST

जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात जलसाठे आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प वगळता इतर सर्वच प्रकल्पांमधील पाणी आटल्याने टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या. त्यात ४२ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांना सध्या पावसाळ्याचे वेध लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला असला तरी भूजल पातळीत थोडीही वाढ झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने अजूनही टँकर सुरु ठेवले आहेत. सद्यस्थितीत २३ गावे आणि १३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक १५ टँकर सुरु असून दररोज २४ फेऱ्या करुन तालुक्यातील १२ हजार ९४७ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड तालुक्यात १० टँकरच्या सहाय्याने १७ हजार २५९ ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत आहे. तर पूर्णा तालुक्यात ८, सेलू तालुक्यात ४ आणि जिंतूर तालुक्यात ५ टँकरच्या सहाय्याने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे.यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे टंचाई जाणवली नाही. मात्र पालम, पूर्णा, जिंतूर या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी टँकर बरोबर विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती, पूरक पाणीपुरवठा योजना आदी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.त्याचप्रमाणे नव्याने विंधन विहीर घेण्याची कामेही केली आहेत. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होऊन टंचाई दूर होईल. मात्र मोठा पाऊस होईपर्यंत प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.टँकर सुरु असलेली गावेपालम तालुका- रामपूर व रामपूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी, पेठपिंपळगाव, तांदुळगाव, पेठशिवणी, पेंडू, बोंदरवाडी, कापसी, फुटतलाव तांडा व धनाजी तांडा, पिराचा तांडा, पायरीका तांडा. पूर्णा तालुका- पिंपळगाव लोखंडे, हिवरा, वाई लासीना, लोण खु., गोविंदपूर, आहेरवाडी, गौर, पिंपळा भत्या. गंगाखेड तालुका- खंडाळी, इळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा, गुंजेगाव, मरडसगाव, लिंबवाडी तांडा, उमाटवाडी, गणेशपुरी, मसनेरवाडी. सेलू तालुका- पिंपळगाव गोसावी, नागठाणा, तळतुंबा, नांदगाव. जिंतूर तालुका- मांडवा, कोरवाडी व कोरवाडी तांडा, वडी, शिवाची वाडी.२०४ विहिरींचे अधिग्रहणउन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० मेपर्यंत २०४ विहिरींचे अधिग्रहण करुन या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले. त्यात २८ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित केल्या. १७६ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ६९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यात ४१, पालम तालुक्यात ३१, पूर्णा २६, सेलू २४, पाथरी ६ आणि मानवत तालुक्यात ४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई