परभणी : ४१ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:31 IST2018-06-18T00:31:53+5:302018-06-18T00:31:53+5:30
व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे १४ जून रोजी घडली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ४१ जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.

परभणी : ४१ जणांवर गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा: व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे १४ जून रोजी घडली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ४१ जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.
जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन १४ जून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद निर्माण झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामध्ये १० अपेक्षा अधिक जण जखमी झाले असून परसराम विक्रम गिते हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उचपार करण्यात आले. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यामध्ये १६ जून रोजी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
परसराम विक्रम गिते यांच्या फिर्यादीवरुन २९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तर प्रताप रघुनाथ गिते यांच्या फिर्यादीवरुन १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यातील ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार भिसे, राऊत, चाटे, इघारे घटनेचा तपास करीत आहेत.