शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४१ टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:43 IST

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली असून सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी खरिपातील पिके नाजूक परिस्थितीत असून जिल्हाभरात उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली असून सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी खरिपातील पिके नाजूक परिस्थितीत असून जिल्हाभरात उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.परभणी जिल्ह्यात पावसाळी हंगामामध्ये सरासरी ७७४ मि. मी. पाऊस होतो. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होते. चार महिन्यांच्या या पावसाळी हंगामातील अडीच महिने संपले असतानाही एकही दमदार पाऊस झाला नाही. १ जून ते २१ आॅगस्ट या काळामध्ये जिल्ह्यात ४७५ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ २७८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५८.५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असून ४१ टक्के पावसाची तूट आजघडीला निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वसाधारणपणे सारखीच परिस्थिती आहे. त्यातही परभणी तालुक्यात ५४ टक्के पाऊस कमी झाला आहे. तर सेलू तालुक्यामध्ये ५२ टक्के पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत पूर्णा तालुक्याची स्थिती काहीसी चांगली आहे. पूर्णा तालुक्यात ४८१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३६९.२० मि.मी. पाऊस आजपर्यंत झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत ७६.६ टक्के पाऊस झाला असून केवळ २३ टक्के पाऊस या तालुक्यात कमी आहे, असे असले तरी संपूर्ण जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. येत्या काळात दमदार पाऊस झाला नाही तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की, काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.अडीच महिन्यात ३५.९ टक्के पाऊस४चार महिन्याच्या पावसाळी हंगामातील अडीच महिने सरले आहेत; परंतु, वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ३५.९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परभणी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७७४.६२ मि.मी. पाऊस होतो. जिल्ह्यात आतापर्यंत २७८ मि.मी. पाऊस झाला आहे.४वार्षिक सरासरीची तुलना करता केवळ ३५.९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. त्यामध्ये पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४५.९ टक्के, गंगाखेड तालुक्यात ४०.३ टक्के, सोनपेठ ३८.५ टक्के, मानवत ३९.८ टक्के, पाथरी ३१.९ टक्के, जिंतूर ३४.९ टक्के आणि सेलू तालुक्यात २८.९ टक्के पाऊस झाला आहे.सिंचन प्रकल्प कोरडेठाक४जिल्ह्यात यावर्षी एकही दमदार पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येलदरी निम्न दुधना हे दोन्ही मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. तर मासोळी, करपरा या मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकाही प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्य स्थितीला प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने अनेक नळ योजना बंद आहेत. पुढील काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प