शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

परभणी : पाण्याअभावी करपली ४ लाख रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:17 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर नामी उपाय म्हणून वनविभागाने मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम सुरु केली. या अंतर्गत २०१६ या वर्षी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ७ लाख २२ हजार वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर एकाही विभागाने वृक्ष जोपासणीकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा पूरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वनविभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतून ६२.६३ टक्के तर २०१७ मध्ये ६३.५८ टक्के झाडे जगल्याचा अहवाल आहे. मात्र प्रत्यक्षात वनविभागाने काढलेल्या टक्केवारी एवढीही झाडे जिल्ह्यात जगली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१८ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ३४ लाख १६ हजार वृक्षरोपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशूसंवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, कारागृह ३ हजार, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वनविभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ लाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास उद्योजकता ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्षलागवडी योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या ३० विभागांपैकी केंद्रीय रेल्वे विभागाने वृक्ष लागवड केली नाही. उर्वरित २९ विभागाने जिल्ह्याला दिलेले ३४ लाख १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करुन २ लाख रोपटे अधिकचे लावण्यात आले.वृक्ष लागवड मोहिमेत एक पाऊल पुढे घेऊन सर्व विभागांनी मोहीम यशस्वी केली; परंतु, वृक्षरोपणानंतर जिल्ह्यात एकही पाऊस झाला नाही.परिणामी लावण्यात आलेल्या रोपट्यांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यातील उजळंबा रस्ता, आर्वी ते कुंभारी, एस.टी. महामंडळ आदी ठिकाणी लावण्यात आलेले रोपे जागेवरच करपली आहेत. त्या अनुषंगाने केलेल्या पाहणीतून जिल्ह्यातील ४ लाख रोपटे पाण्याअभावी जागेवरच करपून गेल्याचे केलेल्या आढळून आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात राबविलेली वृक्ष लागवड मोहिमेचा पावसाळा संपण्यापूर्वीच फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊस