परभणी : सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:46 IST2018-11-22T00:43:19+5:302018-11-22T00:46:15+5:30
शहरातील रोशन खान मोहल्ला भागातील बारादरी मस्जिद परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़

परभणी : सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपी विवाहबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रोशन खान मोहल्ला भागातील बारादरी मस्जिद परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़
परभणी येथे ईद-ए-मिलादुन्नबी सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते़ या अनुषंगाने बुधवारी शहरातील बारादरी मस्जिद परिसरात सकाळी ११़३० च्या सुमारास सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ यावेळी जिल्हाभरातून दाखल झालेले ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़ यावेळी मौलाना रफियोद्दीन अशरफी यांनी निकहाचे पठन केले़ काजी अफजलोद्दीन यांनी सामूहिक दुँआचे पठण केले़ यावेळी वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोनि युनूस शेख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, तहसीन अहमद खान, इरफान उर रहेमान, डॉ़ रिझवान काजी, नगरसेवक शेख अहमद, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक अन्वर खान, अब्दुल हफिज, मो़ ताहेर अली खान, शेख शेरू, हाजी सिराजोद्दीन फारुखी, प्रा़ डॉ़ हामेद हाश्मी, हाजी अशरफ साया, बशीर अहमद, खाजा आमदार आदींची उपस्थिती होती़ यावेळी एहसास जिंदगी ट्रस्टच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५३ नागरिकांनी रक्तदान केले़
शहरातून काढण्यात आला जुलूस
४ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस-ए- मोहम्मदीया समितीतर्फे दुपारी २़३० च्या सुमारास शहरातून जुलूस काढण्यात आला होता़ ग्रँड कॉर्नर परिसरातील बिलाल मशिदीपासून जुलूसला सुरुवात झाली़ शाही मशिद-नारायण चाळ- आऱआर टॉवर, शिवाजी चौकमार्गे ईदगाह मैदानावर सायंकाळी ५ वाजता जुलूसचा समारोप झाला़ यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवांनी उपस्थिती होती़