शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

परभणी ; गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:12 AM

जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास ८ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. १४ जून २०१८ चा विचार करता या दिवसापर्यंत जिल्ह्यात गतवर्षी १११.३५ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १४ जूनपर्यंत फक्त २२.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याची या दिवसापर्यंतची १२६.६१ मि.मी. पावसाची सरासरी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २५ टक्केच पाऊस झाल्याने यावर्षीही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहते की नाही, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. राज्य शासनानेही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळातून जिल्हावासिय अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पाणीटंचाईमुळे सर्व सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. सिद्धेश्वर धरणात १४ जूनपर्यंत १६९.८९ दलघमी मृत पाणीसाठा आहे. तर येलदरी धरणात १२४.६७ दलघमी मृतसाठा आहे. जिवंत पाणीसाठा नसल्याने या मृतसाठ्यातूनच या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना पाणी द्यावे लागत आहे. याशिवाय निम्न दुधना प्रकल्पात १३ जूनपर्यंत २४२.२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही या धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे लवकर पाऊस पडावा, अशी अपेक्षा नागरिकांना वाटू लागली आहे.२८ जूनपर्यंत : दोनच दिवस पावसाचा अंदाज४हवामानाचा अंदाज व्यक्त करणाºया स्कायमेट या खाजगी संस्थेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात २८ जूनपर्यंत फक्त दोनच दिवस पाऊस पडेल, असे सांगितले आहे. त्यामध्ये १६ आणि २० जून या दोन दिवशीच काहीसा पाऊस पडेल, अन्यथा २८ जूनपर्यंत पावसाची सुताराम शक्यता नाही, असे या वेबसाईटचे म्हणणे आहे.४स्कायमेटच्या या अंदाजामुळे जिल्हावासियांच्या घशाची कोरड वाढली आहे. त्यामुळे या संस्थेचा अंदाज खोटा ठरुन धो-धो पाऊस बरसावा, अशीच मनोमन अपेक्षा जिल्हावासियांना वाटू लागली आहे.मानवतमध्ये सर्वाधिक पाऊस४यावर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३८.९९ मि.मी. पाऊस मानवत तालुक्यात पडल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यात ३६.२५ मि.मी. तर पालम तालुक्यात ३२ मि.मी. पाऊस झाला आहे.४ पूर्णा तालुक्यात २४.६० मि.मी. तर सोनपेठ तालुक्यात १८.५० मि.मी., परभणी तालुक्यात १७.१४, पाथरी तालुक्यात १६ मि.मी., जिंतूर तालुक्यात ११ मि.मी. आणि सेलू तालुक्यात फक्त ७ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल