परभणी: अभियंत्यांचे २१ तास आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:45 IST2018-03-28T00:43:20+5:302018-03-28T10:45:14+5:30
वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली.

परभणी: अभियंत्यांचे २१ तास आत्मक्लेश आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली.
वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी जिल्ह्यातील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणावरुन कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे काम करुनही अधीक्षक अभियंता अधिकाऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करीत एसईए संघटनेचे सहसचिव नितीन थिटे यांच्या नेतृत्वाखाली २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपासून अभियंत्यांनी अन्नत्याग करुन आत्मक्लेश आंदोलन सुरु केले. हे आंदोलन मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चालविले. २१ तासानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत अभियंत्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात एसईए संघटनेच्या ४५ अभियंत्यांचा सहभाग होता.