शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

परभणी : २० हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:51 IST

पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी: पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या पिकावर हुमणी अळीचा झालेला प्रादुर्भाव आता मराठवाड्यातही दिसू लागला आहे. या अळीमुळे उसाचे फड अक्षरश: करपून जात आहेत. पाथरी तालुक्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढविले आहे. खरिपातील पिकांनी पावसाअभावी शेतकºयांना चांगलेच अडचणीत आणले आहे. दीड महिन्यापासून पावसाने खंड दिला. परतीच्या पावसावर शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र परतीचा पाऊसही शेतकºयांवर रुसला. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला. मूग, सोयाबीनच्या उताºयात मोठी घट दिसून येत आहे. कापसाने पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. एकदा कापसाची वेचणी झाली की, तो कापूस केवळ पºहाटीपुरता उभा असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खरीप पिकावर येणारे संकट पाहता या भागातील शेतकºयांनी यावर्षी सिंचनाची सोय असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. बारा महिने पाणी, खत, निंदणी यासाठी मोठा खर्चही लागतो आणि तो ऊस उत्पादकांनी केला. अशा परिस्थितीत उसावर हुमणी अळीचे संकट निर्माण झाले आहे. हुमणी अळीमुळे जमिनीतूनच ऊस करपत आहे. एकदा उसाला हुमणी लागली ही अक्षरश: उसाचा संपूर्ण फड अळीच्या प्रादुर्भावात येत आहे. हुमणी अळीवर नियंत्रण आणणे सध्या तरी शक्य होत नाही. उसाचे फड अक्षरश: पोखरले जात आहेत.तालुक्यातील रेणापूर शिवारात जवळपास १ हजार एकर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. रेणापूर भागातील उसावर गेल्या महिनाभरापासून हुमनीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.उभ्या उसातील २५ टक्के क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावात आले आहे. ऊस पीक हुमणीमुळे करपून जाऊ लागले आहे. त्याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे.उताºयात होणार घटपाथरी तालुक्यात रेणापूर, हादगाव, रेणाखळी, सिमूरगव्हाण, कासापुरी, पाथरगव्हाण या भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. शेतकºयांना दरवर्षी एकरी सरासरी ४० ते ५० मे.टन उतारा येतो. मात्र हुमनी अळीच्या संकटाने उत्पादनात घट होऊन ३० ते ३५ मे.टनच उतारा येईल, असा अंदाज ऊस उत्पादकांतून बांधला जात आहे.नुकसान भरपाई देण्याची मागणीखरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला असताना आता उसावर हुमनी अळीचा मोठा प्रादूर्भाव झाल्याने ऊस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. प्रादूर्भावग्रस्त पिकाचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.अतिरिक्त उसाचा प्रश्नही भेडसावणारपाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत. पाथरी रेणुका शुगर्स व लिंबा येथील योगेश्वरी या दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम येत्या महिनाभरात सुरु होतील. या कारखाना क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे हुमनी अळीमुळे संकटात सापडलेल्या ऊस उत्पादकांना अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प