परभणी : सिंचन विहिरींची २१३२ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:39 AM2019-10-12T00:39:35+5:302019-10-12T00:40:19+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींची २ हजार १३२ कामे पूर्ण झाली असून शेततळ्याची १३९ कामे पूर्णत्वास गेली असल्याचा अहवाल या विभागाने शासनाला सादर केला आहे.

Parbhani: 1 work of irrigation wells completed | परभणी : सिंचन विहिरींची २१३२ कामे पूर्ण

परभणी : सिंचन विहिरींची २१३२ कामे पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींची २ हजार १३२ कामे पूर्ण झाली असून शेततळ्याची १३९ कामे पूर्णत्वास गेली असल्याचा अहवाल या विभागाने शासनाला सादर केला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम मिळावे, यासाठी विविध कामे हाती घेण्यात येत असतात. या अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचनाची २ हजार १३२ कामे पूर्ण करण्यात आली. तर २ हजार ९७७ कामे या वर्षाअखेरीस सुरु असल्याची माहिती या विभागाने दिली आहे. शेततळ्याची जिल्ह्यात १३९ कामे पूर्ण झाली असून ४७५ कामे सुरु असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात भूविकासाची तीनकामे पूर्ण झाली असून ४२ कामे सुरु आहेत. भारत निर्माण, राजीव गांधी सेवा केंद्रांतर्गत जिल्ह्यात एकही काम सुरु नाही. ग्रामीण पेयजलाचे जिल्ह्यात फक्त एक काम चालू असून ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत ४९७ कामे पूर्ण झाली असून १७३ कामे सुरु असल्याचे या विभागाने सांगितले. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्याची ६५ कामे पूर्ण झाली असून ३६७ कामे सुरु आहेत.
जलसंधारण व जलसंवर्धन विषयक जिल्ह्यात २८८ कामे पूर्ण झाली असून २५८ कामे सुरु आहेत. दुष्काळ प्रतिबंधात्मक ५६ कामे जिल्ह्यात यावर्षात पूर्ण झाली. ३८० कामे सुरु आहेत. जमिनीच्या विकासाकरीता जिल्ह्यात सिंचनाची २ हजार ५०३ कामे पूर्ण झाली असून १२ हजार १४१ कामे चालू आहेत. पारंपारिक जलस्त्रोतांचे नुतनीकरण करण्याची ६ कामे करण्यात आली.
जिल्ह्यात दीड लाख खाते बँकेत उघडले
४जिल्ह्यात बँक/पोस्टात खाते असलेल्या नोंदणीकृत मजुरांची १ लाख ६२ हजार ६३१ खाते उघडण्यात आले आहेत. वर्षभरात रोहयोच्या कामावर ४७ हजार ६६५ मजुरांनी काम केले असून त्यामध्ये १८ हजार १०२ महिला तर ५२ अपंग मजुरांचा समावेश होता, असेही या संदर्भातील अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Parbhani: 1 work of irrigation wells completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.