Parabhani ZP Result 2026: मतमोजणीची सुरुवातच रंगतदार; उद्धवसेना-शिंदेसेना, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

By मारोती जुंबडे | Updated: February 9, 2026 11:27 IST2026-02-09T11:26:58+5:302026-02-09T11:27:16+5:30

विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आघाडी घेतल्याने तालुक्यात चुरशीची लढत रंगली आहे.

Parabhani ZP Result 2026: The counting of votes has started in a colorful manner; Somewhere Uddhav Sena, somewhere Shinde Sena, while Congress-BJP are also ahead | Parabhani ZP Result 2026: मतमोजणीची सुरुवातच रंगतदार; उद्धवसेना-शिंदेसेना, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

Parabhani ZP Result 2026: मतमोजणीची सुरुवातच रंगतदार; उद्धवसेना-शिंदेसेना, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरुवात होताच पहिल्या कलांमध्ये परभणी तालुक्यात रंगतदार चित्र पाहायला मिळत आहे. विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आघाडी घेतल्याने तालुक्यात चुरशीची लढत रंगली आहे.

शिंगणापूर जिल्हा परिषद गटात उद्धवसेनेने सुरुवातीपासून आघाडी घेतली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे जांब सर्कलमध्येही उद्धवसेनेला अनुकूल कल मिळाल्याचे दिसून येत आहे.
पिंगळी सर्कलमध्ये शिंदे सेनेने आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. पेडगाव सर्कलमध्ये काँग्रेसने दमदार सुरुवात करत आघाडी मिळवली आहे. टाकळी बोबडे सर्कलमध्ये शिंदे सेनेचा वरचष्मा दिसत असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पक्षाला अनुकूल वातावरण आहे. तर झरी  सर्कलमध्ये भाजपने आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांची आघाडी असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.मतमोजणीची प्रक्रिया सात फेऱ्यांत पार पडणार असल्याने अंतिम निकालासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : परभणी ZP चुनाव 2026: शुरुआती मतगणना में कांटे की टक्कर।

Web Summary : परभणी ZP चुनाव की शुरुआती मतगणना में कांटे की टक्कर दिख रही है। शिंगणापुर में शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) आगे, जबकि शिंदे सेना टाकली बोबडे में हावी है। पेडगाँव में कांग्रेस, जरी में भाजपा को बढ़त। अंतिम परिणाम का इंतजार।

Web Title : Parbhani ZP Election 2026: Tight race in early counting rounds.

Web Summary : Initial Parbhani ZP election counting shows a competitive landscape. Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leads in Shingnapur, while Shinde Sena dominates Takli Bobade. Congress gains in Pedgaon, BJP in Zari. Final results await.