परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ गट आणि १०८ पंचायत समिती गणांसाठी सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. ७४.८९ टक्के इतक्या विक्रमी मतदानानंतर सर्वांचे लक्ष निकालांकडे लागले होते. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, सेलू तालुक्यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे, तर सोनपेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत आहे.
सेलू तालुका: भाजपचा 'चौकार' सेलू तालुक्यात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. चिकलठाणा गटातून भाजपचे प्रसाद डासाळकर तर वालूर गटातून साक्षी साडेगावकर यांनी विजय मिळवला आहे. पंचायत समिती गणांमध्येही वालूरमधून गणेश मुंडे, मोरेगावमधून द्रोपती मगर आणि बोरकिनीमधून सुलभाबाई घुगे या भाजप उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. दरम्यान, चिकलठाणा गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अनिरुद्ध नाईक विजयी झाले आहेत.
सोनपेठ आणि मानवत: राष्ट्रवादीची आगेकूच सोनपेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर यांनी शेळगाव गटातून विजय संपादन करत घरातील राजकीय वारसा टिकवून ठेवला आहे. शेळगाव गणातून पद्मसिंह देशमुख आणि शिरशी गणातून कस्तुरा भंडारे यांनीही राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. मानवतमध्ये दुसऱ्या फेरीअखेर रामपुरी, ताडबोरगाव आणि कोल्हा गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे, तर केकरजवळा गटात शिवसेना (शिंदे गट) चुरस देत आहे.
इतर तालुक्यांतील कल गंगाखेडमधील गुंजेगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे, तर कोदरी गटात भाजपने वर्चस्व राखले आहे. पाथरी तालुक्यातील हादगाव बुद्रुकमध्ये पाचव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयाच्या समीप पोहोचले आहेत. परभणी जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या समीकरणात आता छोटे पक्ष आणि अपक्ष किंगमेकर ठरतात की महायुती-महाविकास आघाडी बाजी मारते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Parbhani ZP election results show BJP's dominance in Selu. In Sonpeth, the Vithekar family retains control. NCP leads in Sonpeth and Manvat. Smaller parties may become kingmakers.
Web Summary : परभणी ZP चुनाव परिणाम दर्शाते हैं कि सेलू में भाजपा का दबदबा है। सोनपेठ में विटेकर परिवार का नियंत्रण बरकरार है। सोनपेठ और मानवत में राकांपा आगे है। छोटे दल किंगमेकर बन सकते हैं।