शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Parabhani: फेसबुकवर शासनाची बदनामी करणारी पोस्ट करणारा शिक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:16 IST

मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील सहशिक्षकावर कारवाई

परभणी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेबाबत समाजमाध्यमांवर अर्धवट व दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट केल्यामुळे शासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे कारण देत मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील सहशिक्षक देवीदास शिंपले यांना १० ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, देवीदास शिंपले यांनी ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर “राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारामागचे गौडबंगाल बाहेर आणणार” या शीर्षकाखाली पोस्ट करत राज्य शिक्षक पुरस्कार २०२४ च्या प्रक्रियेवर कोणतेही ठोस पुरावे न देता आक्षेप नोंदविले होते. याशिवाय, त्यांनी शासनाच्या धोरणावर टीकात्मक भाष्य केले होते. पुढे ४ सप्टेंबर रोजी त्यांनी ती पोस्ट हटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी १० ऑक्टोबर रोजी शिंपले यांचे निलंबन आदेश काढले. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, त्यांच्या कृतीमुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची तसेच शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे.

उपस्थित प्रश्नांची चौकशी होणार का?मात्र, देवीदास शिंपले यांनी त्यांच्या पोस्टमधून संस्थेतील काही अनियमिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी शिक्षण विभाग करणार का, हा प्रश्न आता परभणीकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षकाची निलंबन कारवाई करताना त्यांच्या आरोपांची पडताळणी होणार का? की निलंबनावरच प्रकरण थांबविले जाणार, असा प्रश्न नागरिक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून विचारला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Teacher Suspended for Defaming Government on Facebook Post

Web Summary : A teacher in Parbhani was suspended for a Facebook post criticizing the state teacher award process and government policies, allegedly tarnishing the government's image. Questions raised in the post about institutional irregularities remain unaddressed, sparking public debate.
टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकsuspensionनिलंबन