शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत उद्धवसेनेच्या 'संजूभाऊ-राहुल पाटील' जोडीची जादू! भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:47 IST

परभणीत ३७ जागांसह उद्धवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

- विजय पाटील

परभणी: मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा ट्रेंड कायम असल्याचे परभणीकरांनी दाखवून दिले. खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील यांनी काँग्रेससोबत आघाडी करून ३७ जागा पटकावत स्पष्ट बहुमताने महापालिकेवर वर्चस्व मिळविले. मागच्या वेळी एकहाती सत्ता मिळविणाऱ्या काँग्रेसला यावेळी उद्धवसेनेच्या माध्यमातून सत्तेची संधी मिळणार आहे.

परभणी महापालिकेत मागच्या वेळी काँग्रेसची ३१ जागांसह एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादी १९ जागांसह दुसऱ्या स्थानी होती. भाजप ८ जागांसह तिसऱ्या, तर शिवसेना ५ जागांसह चक्क चौथ्या स्थानी होती. त्यातही त्यांची दोन शकले पडली आहेत. या निवडणुकीत खा. संजय जाधव यांनी आ. राहुल पाटील यांना पूर्ण मोकळीक देत पाठीशी खंबीर उभे राहिल्याने हे सकारात्मक चित्र दिसत आहे. यामुळे उद्धवसेनेने लोकसभा, विधानसभेचा आपला पारंपरिक मतदार राखण्यासाठी तसेच या समाजातील आपली पकड कायम ठेवण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी केली. काँग्रेसच्याच अनेकांना उद्धवसेनेकडून उभे केले. त्यामुळे २५ जागांसह उद्धवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला, तर १२ जागांसह काँग्रेस व भाजप दुसऱ्यास्थानी आहे, तर राष्ट्रवादी ११ जागांसह तिसऱ्या स्थानी राहिली. जनसुराज्य शक्तीने मनपाच्या निवडणुकीतही आश्चर्यकारकरीत्या प्रभाग १३ मध्ये ३ जागा पटकावत सोनपेठनंतर येथेही दणक्यात एन्ट्री केली. या ठिकाणीही त्यांनी राष्ट्रवादीलाच धोबीपछाड दिली. दुसरे म्हणजे आ. रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेनेच्या आघाडीच्या माध्यमातून उभे केलेल्या १९ पैकी एकाच उमेदवाराला यश आले, तर प्रभाग ७मध्ये काँग्रेसच्या गडात एका अपक्षाने बाजी मारली.

राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर यांना माजी महापौर प्रताप देशमुख व अक्षय देशमुख यांच्यात शेवटपर्यंत समन्वय घडवून आणता आला नाही. काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांना त्यांच्याच प्रभागात अडकवले. माजी खा. तुकाराम रेंगे यांना मुलगा भाजपकडून उभा राहिल्याने फिरता येत नव्हते. माजी आ. बाबाजानी दुर्राणी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, भगवान वाघमारे, नदीम इनामदार आदींनी ठरावीक भागातच लक्ष दिले.

महायुती झाली नसल्याचा फटकापालकमंत्री मेघना बोडर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी भाजपसाठी जोर तर लावला मात्र यश आले नाही. भाजप महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे व शिंदेसेना जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे या बंधूंच्या युतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्यास त्यांना वेगळे चित्र दिसले असते. मात्र, एकमेकांवर कुरघोडीतच भाजप हैराण होती. ज्या प्रभाग ९ व ४ साठी युती तोडली. त्यापैकी ९ मध्ये सफाया झाला, तर ४ मध्ये अनेक वादांनंतर २ जागा राखल्या. फक्त प्रभाग ५ पूर्ण जिंकला, तर शिंदेसेनेला भोपळाही फोडता आला नसला तरी भाजपला त्यांनी जेरीस आणले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena-Congress alliance triumphs in Parbhani, defeating BJP-NCP in election.

Web Summary : In Parbhani, the Uddhav Sena-Congress alliance secured a clear majority in municipal elections, winning 37 seats. This victory, driven by Sanjay Jadhav and Rahul Patil, sidelines the previous ruling Congress and significantly impacts the BJP and NCP, showcasing a shift in local political power.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६sanjay jadhav ubtसंजय जाधव