परभणीत अपहरणाच्या संशयावरून युवकास दिला बेदम चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 18:08 IST2018-06-19T18:08:04+5:302018-06-19T18:08:04+5:30
अपहरणाच्या संशयावरून १०० ते १५० जणांच्या जमावाने एका युवकास बेदम मारहाण केली.

परभणीत अपहरणाच्या संशयावरून युवकास दिला बेदम चोप
परभणी : मुलांचे अपहरणाच्या संशयावरून १०० ते १५० जणांच्या जमावाने एका युवकास बेदम मारहाण केली. हि घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास दर्गा रोड परिसरात घडली.
सध्या जिल्हाभरात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरली आहे. सोशल मिडीयाने या अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. यातूनच आज दुपारी दर्गा रोड परिसरात एक अनोळखी युवकास मुले पळविणारा असल्याच्या संशयावरून १०० ते १५० जणांच्या जमावाने पाठलाग बेदम मारहाण केली.
हि बाब या चाँद लाला, शेख माजीद, शेख महम्मद यांच्या निदर्शनास आली त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मधुकर चट्टे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीतून युवकाची सुटका केली. पोलीस ठाण्यात त्याची विचारपूस केली असता, त्याने अहमदपूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील असल्याचे त्यांनी सांगितले़. तसेच नांदेड येथे जात असताना परभणी रेल्वेस्थानकावर थांबलो असता १० ते १५ जणांनी बळजबरीने गाडीवर बसवून नेले असेही त्याने सांगितले. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नव्हता.