शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत लाचखोर हवालदार एसीबीच्या कचाट्यात; ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले

By राजन मगरुळकर | Updated: March 7, 2026 13:55 IST

तक्रारीवर कारवाई करण्यासाठी मागितली लाच; हवालदार अटकेत.

परभणी : तक्रारदाराच्या मुलीने सोनपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली, हे विचारण्यास गेले असता पोलिस हवालदार भगवान मुंढे यांनी आरोपीवर पावबंद करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी केली होती. पडताळणीनंतर शुक्रवारी गंगाखेड-परळी मार्गावर निळा फाटा येथे सापळा कारवाईत पोलिस हवालदाराने आठ हजारांची लाच स्वीकारली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागपरभणीच्या पथकाने केली.

भगवान विठ्ठल मुंढे (५४, पोलिस हवालदार, नेमणूक सोनपेठ पोलीस ठाणे) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. गोशाळा चालवण्याचा व्यवसाय तक्रारदार करतात. त्यांची मुलगी गो-शाळेत हजर असताना काही इसमांनी शाळेत येऊन दीड वर्षांपूर्वी गाय व दोन वासरे सोडली होती. ती परत द्या, असे म्हणून मुलीस शिवीगाळ करीत गाय वासरे घेऊन गेले. याबाबत तक्रारदार यांच्या मुलीने पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारी अर्ज बीट जमादार भगवान मुंढे यांच्याकडे चौकशी करीता देण्यात आला होता. या अर्जावर काय कारवाई केली, हे विचारण्यासाठी तक्रारदार गेले असता जमादार मुंढे यांनी अर्जावर मी कारवाई करतो, पण त्यासाठी मला तुम्ही दहा हजार रुपये द्या, अशी लाच मागणी केली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने २५ फेब्रुवारीला परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्वलक्ष्मी रसवंतीगृह येथे केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान हवालदार मुंढे यांनी दहा हजाराची मागणी केली. तक्रारदाराने तडजोड अंती आठ हजार रुपये देतो म्हटले असता हवालदार मुंढे यांनी आठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली. या प्रकरणात शुक्रवारी विश्वलक्ष्मी रसवंतीगृह निळा फाटा येथे सापळा कारवाई करण्यात आली. बीट जमादार भगवान मुंढे यांनी पंचासमक्ष आठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली.

आरोपीची प्रकृती बिघडली...सापळा कारवाईनंतर पुढील प्रक्रियेत मोबाईल जप्ती तसेच आरोपीची अंगझडती घेण्यात आली. यामध्ये आरोपी लोकसेवक भगवान मुंढे यांच्याकडे एक मोबाईल, एक वॉलेट, पोलिस ओळखपत्र, मतदान कार्ड आणि रोख रक्कम ६५० रुपये मिळून आले. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीची प्रकृती यानंतर बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी रेफर केल्याने त्याच्या नातेवाईकांना सूचनापत्र देऊन नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आले. ही सापळा कारवाई पोलिस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक मनीषा पवार आणि पथकाने केली. सरकार पक्षातर्फे पोलिस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी सोनपेठ ठाण्यात फिर्याद दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Policeman Caught Red-Handed Accepting Bribe of ₹8,000

Web Summary : A police constable in Parbhani was arrested accepting ₹8,000 bribe for acting on a complaint. ভগবান मुंढे demanded money from a complainant whose daughter had filed a case. ACB laid a trap and caught him. His health deteriorated post-arrest.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसparabhaniपरभणी