- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी): जालना-जिंतूर महामार्गावर गणेशपूरजवळ सोमवारी मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत परभणीचे ज्येष्ठ पत्रकार नितीन धुत आणि जिंतूरचे सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून परभणीकडे जाणारी कार (क्र. MH22 AW 5115) आणि जिंतूरकडून संभाजीनगरकडे जाणारी कार (क्र. MH14 FS 0897) यांची चारठाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपूर जवळ मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चक्काचूर झाला.
पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची मदतअपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस सपोनी नेव्हल, जाकेर सय्यद, बालासाहेब गीराम, मेथके आणि हाके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या चारही गंभीर जखमींना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन जणांची प्राणज्योत मालवलीरुग्णालयात तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार नितीन धुत यांना मृत घोषित केले. तर, सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मनोज कन्हैयालाल तोष्णीवाल आणि चालक विजय ताडकळसकर (दोघेही रा. परभणी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परभणी जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्र आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A head-on collision near Ganeshpur claimed the lives of journalist Nitin Dhut and officer Sanjay Abdagire. Two others are critically injured. The accident occurred late Monday night on the Jalna-Jintur road, leaving both vehicles heavily damaged. Police are investigating.
Web Summary : गणेशपुर के पास एक भीषण टक्कर में पत्रकार नितिन धूत और अधिकारी संजय आबदागिरे की जान चली गई। दो अन्य गंभीर रूप से घायल हैं। दुर्घटना सोमवार देर रात जालना-जिंतूर मार्ग पर हुई, जिससे दोनों वाहन बुरी तरह क्षतिग्रस्त हो गए। पुलिस जांच कर रही है।