सर्वधर्मीय समितीच्या अध्यक्षपदी पांचाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST2021-04-07T04:18:04+5:302021-04-07T04:18:04+5:30
मागील अकरा वर्षांपासून सर्वधर्मीय नागरिकांच्या सामूहिक समन्वयातून सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जातो. या अनुषंगाने डॉ. सुनील जाधव ...

सर्वधर्मीय समितीच्या अध्यक्षपदी पांचाळ
मागील अकरा वर्षांपासून सर्वधर्मीय नागरिकांच्या सामूहिक समन्वयातून सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जातो. या अनुषंगाने डॉ. सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावर्षी संविधान सन्मान महोत्सव म्हणून वर्षभर विविध कृती कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे क्रांतिबा फुले जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यान, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रबोधनात्मक देखावा, कोरोना लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविणे, सम्यक जीवन पुरस्कार प्रदान सोहळा, आदर्श भीम जयंती मंडळांना पुरस्कार, व्याख्यान, परिसंवाद, कविसंमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीत जयंती महोत्सवाचे कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी प्रा.कन्हैया पाटोळे, मुख्य प्रवर्तकपदी प्रा. डॉ. सुरेश शेळके, त्याचप्रमाणे उपक्रमप्रमुख डॉ. सुनील जाधव, सुभाष ढगे, बाबूराव केळकर, नागेश कुलकर्णी, उपाध्यक्ष जी.डी. पोले, दिगंबर जाधव, सुशीलकुमार देशमुख, डी. सी. डुकरे, समन्वयक परमेश्वर जवादे, किसनराव धबाले, उत्तमराव गायकवाड, संजय गायकवाड, सहसमन्वयक : एस.एस. गरूड, विठ्ठल रणबावरे, नितीन जाधव, शंकर कदम, माउली शिंदे, संघटक : प्राचार्य विठ्ठल घुले, घनश्याम साळवे, पी. बी. पंचाळ, प्रकाश शिंदे, नारायण कदम, भारत कनकुटे, मा.म. बरे, सचिव ॲड. सुजित अबोटी, सुमित जाधव, किशोर रन्हेर, सहसचिव : खय्युम बेग, संग्राम माने, बाळासाहेब कड, प्रचार-प्रसारप्रमुख : पत्रकार शिवाजी वाघमारे, संजय भराडे, गणेश पांडे, प्रभू दीपके, सुरेश मुळे, मुख्य प्रवर्तक : यशवंत मकरंद, संजीव आढागळे, सुनील ढवळे, सुरेश शेवाळे, रवी पंडित, प्रेमानंद बनसोडे, प्रा.राजकुमार मनवर, मार्गदर्शक : विश्वनाथ झोडपे, प्राचार्य सुरेश सदावर्ते, प्रा. तुकाराम साठे, एन. आय. काळे, प्राचार्य प्रल्हाद मोरे, अनंतराव शिंदे, महिला समन्वयक समिती : डॉ.विद्या सरपे, डॉ. वर्षा खिल्लारे, प्रा. अंजली धुतमल, स्वरलक्ष्मी लहाने, भारती राऊत आदींची निवड करण्यात आली आहे. तसेच विविध समित्यांचे गठन केले जाणार असल्याची माहिती महोत्सव समितीने दिली.