जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़ ...
येथील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अयोग्य नियोजनामुळे १३१़२८ कोटी रुपयांच्या निधीची अडवणूक झाली असल्याची बाब नागपूरच्या महालेखापालांनी केलेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ लेखापरीक्षणात मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत़ ...
येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे. ...
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत तालुक्यातील ४३० घरांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने १५ आॅक्टोबरपर्यंत ३७२ घरांना वीज जोडणी दिली आहे. उर्वरित ५८ घरातील वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़ ...
येथील महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासूनचे पगार रखडल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत़ दसरा हा सण जवळ आला असून, या पार्श्वभूमीवर थकलेले पगार करावेत, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिकेला सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़ चार ...
शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले. ...
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठी वापरल्या जावे, या उद्देशाने प्रकल्पातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...