सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़ ...
मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़ ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने माजी खा़ नीलेश राणे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़ ...
अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत १६ जानेवारी रोजी गंगाखेड शहर बंद पुकारण्यात आला़ या बंदला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...
जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आल ...
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ...
येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. ...