शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. ...
पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून सुरुवातीला लेखी परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. ...
दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून एका तालुक्यातील शिक्षकास तालुका सोडून दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षकाची नियुक्ती दिल्याने संताप व्यक्त होत आहे. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी धरणे आ ...
देशात सत्ता बदल झाली तरीही जवानांचा बळी जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजपा हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. तेव्हा देश दहशतवाद मुक्त करायचा असेल तर वंचितांना सत्ता द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंब ...
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरासह गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. दहशतवाद्यांना अद्दल घडविसाठी शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी याव ...
मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़ ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून, या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़ ...