जिल्ह्यातील पालम येथील पालम तलवाचे सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने ३ कोटी ८ लाख ११ हजार ४० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तलवाच्या परिसरात विकासकामे होणार आहेत. ...
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी जिल्ह्यातील ४१० केंद्रांवर ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. ...
रविवारी सायंकाळी आचारसंहिता जाहीर होण्याची कुणकुण लागताच तातडीने जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीवर बोलावून प्रलंबित कामांना मंजुरी देण्याची घाई गडबड केली जात असल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी- ...
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८ मार्च रोजी कौसडी येथील आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वेशांतर करुन छापा टाकला. यात सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचाऱ्यांच्या सायकलींची व दोन कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलींची चोरी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
पाथरी ते तुरा या रस्त्यावर दुचाकी अडवून एकास लुटल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वारसदारांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवजाच्या आधारे तालुक्यातील खादगाव येथील रेशन दुकान आपल्या नावाने करणाऱ्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने ८ मार्च रोजी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे. ...