सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. ...
येथील रेल्वेस्थानक परिसरातील न्यायालयाची निजामकालीन इमारत धोकादायक झाल्याने या न्यायालयातील १२ न्यायालये आणि त्या अंतर्गत कार्यालये मंगळवारी प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाली असून, आता या ठिकाणावरूनच न्यायदानाचे काम केले जाणार आहेत़ ...
स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होऊन ५९ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ या प्रदीर्घ कालावधीत राज्यातील एक भाग असलेल्या परभणी जिल्ह्याने काय कमावले, काय गमावले, याचे अवलोकन केले असता, एक-एक वर्षे सरते झाले़ मात्र जिल्ह्यातील विकास विषयक प्रश्नांची स्थिती ...
जागा विकत का देत नाहीस, या कारणावरून एका वृद्ध महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझूर येथे घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ ...
शहरातील नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती या प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारलेले पाणवठे शोभेचे बाहुले ठरत असून, नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, दोन ट्रॅली तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने पकडले आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखालील धारखेड, झोला शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...
उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुक ...
लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर मतदार संघातील ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची चिठ्ठ्यांची मोजणी करून ती मतदानाशी पडताळून घेतली जाणार आहे़ ...