लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर मतदार संघातील ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची चिठ्ठ्यांची मोजणी करून ती मतदानाशी पडताळून घेतली जाणार आहे़ ...
युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे़ जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी प्रत्यक्ष आचारसंहिता शिथिल झाली नसल्याने चालू आर्थिक वर्षातील कामांचा आराखडा तयार करण्यासाठी किमान एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे़ ...
वाचनाने विचार प्रगल्भ होतात़ त्याचबरोबर पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते़ त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ़ अशोक ढवण यांनी केले़ ...
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...
दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस ...
गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथील सरपंच पुष्पादेवी राम मुंडे यांनी अविश्वास ठरावाविरूद्ध दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी फेटाळून लावले आहे़ ...