२६२ रुग्णांना दिला जातोय ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:04+5:302021-05-30T04:16:04+5:30

कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने ऑक्सिजन खाटांची निर्मिती केली आहे. ...

Oxygen is given to 262 patients | २६२ रुग्णांना दिला जातोय ऑक्सिजन

२६२ रुग्णांना दिला जातोय ऑक्सिजन

कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने ऑक्सिजन खाटांची निर्मिती केली आहे. या खाटा सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्ह्यात १ हजार १५५ ऑक्सिजन खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागात ६२६ खाटा असून, त्यापैकी ऑक्सिजन खाटांवर ११२ आणि व्हेंटिलेटरवर २६ रुग्ण उपचार घेत आहेत. ३८८ खाटा सध्या रिक्त आहेत. अतिदक्षता विभाग वगळून ५२९ ऑक्सिजन खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर १५३ रुग्ण उपचार घेत असून, ३७६ ऑक्सिजन खाटा सध्या रिक्त आहेत.

कोरोना रुग्णालयांमध्ये १ हजार ५९२ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात सध्या ४०१ रुग्ण उपचार घेत असून, १ हजार १९१ खाटा रिक्त आहेत. तर कोरोना केअर सेंटर्समध्ये २ हजार ३७३ खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या केंद्रात २२५ रुग्ण उपचार घेत असून, २ हजार १४८ खाटा रिक्त आहेत. एकंदरीत रिक्त खाटांची संख्या पाहता कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचे दिसत आहे.

Web Title: Oxygen is given to 262 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.