परिस्थितीवर मात करीत आकाशची पीएसआयपर्यंत झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST2021-01-15T04:15:06+5:302021-01-15T04:15:06+5:30
आकाश वाव्हळे हा मूळचा तालुक्यातील शेंडगा या गावचा रहिवासी. डोंगरी भाग असल्याने उपजीविकेसाठी शेती आणि मजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय ...

परिस्थितीवर मात करीत आकाशची पीएसआयपर्यंत झेप
आकाश वाव्हळे हा मूळचा तालुक्यातील शेंडगा या गावचा रहिवासी. डोंगरी भाग असल्याने उपजीविकेसाठी शेती आणि मजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रोहिदास व्हावळे आणि पत्नी सुलोचनाबाई या स्वत: अशिक्षित असतानाही आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. रोहिदास वाव्हळे यांना पाच मुले आहेत. त्यापैकी परमेश्वर, राजकुमार, प्रशांत हे भारतीय सैन्यदलात सीमेवर देशसेवेचे अनमोल कर्तव्य बजावत आहेत. मोठा मुलगा संजय व्हावळे शेती करतो. तर सर्वात लहान असलेल्या आकाशने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आकाशला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हरंगुळपर्यंत पायपीट करावी लागली. दहावी इयत्तेत तो शाळेतून प्रथम आला. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर आकाशने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. या परीक्षेतून आकाशची पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आकाश व्हावळे पोलीस उपनिरीक्षक होणारा गावातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.