शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा 'चंद्रपूर पॅटर्न' फसला! परभणीत महापौर निवडीनंतर आ. राहुल पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:23 IST

या निवडणुकीत केवळ काँग्रेसचच नाही, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एका अपक्ष नगरसेवकानेही आम्हाला मतदान केले आहे.

परभणी: "परभणी महापालिकेवर आमचाच महापौर बसणार हे पहिल्या दिवसापासून पक्के होते. विरोधकांनी चंद्रपूरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा, म्हणजेच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धवसेना आणि काँग्रेसचा एकमेकांवरील विश्वास अभेद्य राहिला," अशा शब्दांत उद्धवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महापौर निवडीची प्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'मातोश्री'च्या भेटीवर भर नगरसेवकांच्या मुंबई वारीवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना पाटील म्हणाले की, "आमचे नगरसेवक कोणत्याही सहलीला गेले नव्हते. आम्ही त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि मार्गदर्शनासाठी घेऊन गेलो होतो. विरोधकांनी आमचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न केले, मात्र आम्ही तो डाव उधळून लावला."

राष्ट्रवादी आणि अपक्षांचाही पाठिंबा या निवडणुकीत केवळ काँग्रेसचच नाही, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एका अपक्ष नगरसेवकानेही आम्हाला मतदान केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, विरोधकांकडे कोणताही जनाधार उरलेला नाही, त्यांनी आपला पराभव आता खिलाडूवृत्तीने मान्य करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

परभणीचा चेहरामोहरा बदलणार सत्तेचा विजय साजरा करतानाच पाटील यांनी भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली. "परभणीसमोर स्वच्छतेपासून ते ड्रेनेजपर्यंत अनेक मोठे प्रश्न आहेत. आमचे नूतन महापौर सय्यद इकबाल यांच्या नेतृत्वात पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल. परभणीत लवकरच मोठा बदल दिसेल आणि या क्रांतीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Opposition's 'Chandrapur Pattern' fails; MLA Patil slams rivals after mayoral win.

Web Summary : MLA Rahul Patil criticized the opposition's attempt to replicate the 'Chandrapur pattern' in Parbhani's mayoral election. He highlighted the unwavering unity between Uddhav Sena and Congress, along with support from NCP (Ajit Pawar faction) and independents. Patil pledged to address Parbhani's infrastructure challenges under the new mayor's leadership.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६