कृषी कायद्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:21+5:302020-12-11T04:43:21+5:30

संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी परभणी : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात संत संताजी जगनाडे ...

Opposition to agricultural laws | कृषी कायद्यांना विरोध

कृषी कायद्यांना विरोध

Next

संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

परभणी : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक दि.फ. लोंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास एन.एम. नवगिरे, एच.बी. पोपळघट, बी.आर. पाथरीकर, परमेश्वर पवार, एम.जी. साठे, एम.एन. सावणेकर, एम.बी. नवगिरे आदींची उपस्थिती होती. एम.टी. तुरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय आरगडे, अविनाश परधणे, पवन आडे आदींनी प्रयत्न केले.

इंगळे, दातार यांचा सत्कार

परभणी : कोरोनाच्या संकट परिस्थितीतही भारतीय स्टेट बँकेच्या देवगावफाटा शाखेतील शाखाधिकारी सचिन इंगळे आणि दातार यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन दिले. याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ मुसळे, आर.एस. अंभोरे, विनायक पवार, ढाले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Opposition to agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.