‘ऑनलाइन’ने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST2021-03-29T04:11:45+5:302021-03-29T04:11:45+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील अपवाद वगळता आतापर्यंत शाळा बंद ...

‘ऑनलाइन’ने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील अपवाद वगळता आतापर्यंत शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण मात्र जोरात सुरू आहे. मोबाइलवर आलेली लिंक उघडून अध्यापन करणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये आता लिहिण्याची सवय कमी झाली आहे. त्यामुळे हस्ताक्षराकडेही दुर्लक्ष झाले असून, विद्यार्थी लिहिण्यापासून दूर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नियमित लिखाण, अध्ययन या बाबींमध्ये खंड पडल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षिणक नुकसान होत आहे. त्यामुळे आता पालकांनीच गुरुजनांची भूमिका निभावून विद्यार्थ्यांकडून कटाक्षाने लिखाण, हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शाळेमध्ये मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मतानुसार भाषेच्या विकासाचा पायाभूत पैलूंपैकी र्त्त्वात्वाचा पैलू हा लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित झाल्याशिवाय संभाषण कौशल्य विकसित होणार नाही. ऑनलाइनमुळे मुले शुद्धलेखन विसरून जात आहेत. मोबाइलवरील संभाषण हे जास्त काळ ऐकले जाऊ शकत नाही. त्यातच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा परिपूर्ण संवाद होत नाही. याचाही परिणाम भाषा अभ्यास व इतर विषयाच्या अध्यापन गतीवर होत आहे. लेखन कौशल्य अत्यावश्यक असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
विद्यार्थ्यांनो हे करा !
शाळेत शिक्षण घेत असताना गुरुजींनी दिलेला अभ्यास लिहून घेणे तसेच गृहपाठ करण्याची सवय विद्यार्थ्यांना होती. ती कायम ठेवावी.
मराठी हस्ताक्षरासाठी दररोज किमान एक तास दोन रेघी वहीवर आणि इंग्रजी हस्ताक्षरासाठी चार रेघी वहीवर सराव करावा.
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात....
लेखन कौशल्यातूनच संभाषण कौशल्य विकसित होत असते. लेखनातून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते. ऑनलाइनमुळे हा विकास खुंटतो की काय, अशी भीती आहे.
-सुभाष ढगे, शिक्षक
शैक्षणिक कार्यात लेखणाला महत्त्व आहे. मूल्यांकनासाठी लेखी परीक्षा हेच माध्यम आहे. त्यामुळे हस्ताक्षर चांगले नसेल व गती नसेल तर गुणांवर परिणाम होतो.
-सुभाष ढगे, शिक्षक
मोबाइलवरून येणाऱ्या गृहपाठाचा स्क्रिनशॉट काढण्याऐवजी तो संपूर्ण लिहून घेणे पालकांनी बंधनकारक करावे.