दारूसाठी पैसे देत नसल्याने एकावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:18 IST2021-03-05T04:18:03+5:302021-03-05T04:18:03+5:30
झरी येथील गंगाधर दत्तराव भुसारे यांचे गावात बसस्थानक परिसरात सलूनचे दुकान आहे. दोन मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ...

दारूसाठी पैसे देत नसल्याने एकावर चाकूने वार
झरी येथील गंगाधर दत्तराव भुसारे यांचे गावात बसस्थानक परिसरात सलूनचे दुकान आहे. दोन मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास किरण रगडे हा दुकानात जाऊन गंगाधर भुसारे यांचा मुलगा विलास याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे दिले नसल्याने त्याने दुकानात अंडे फोडले. याबाबतची माहिती मिळताच गंगाधर भुसारे हे दुकानात गेले. यावेळी त्यांनी किरण रगडे याला त्यांनी जाब विचारला असता त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांचा मुलगा विलास याच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी गंगाधर भुसारे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याने त्याच्याजवळील चाकूने गंगाधर भुसारे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ, पोटरीवर मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आजबाजूच्या व्यक्तींनी सोडवासोडव केली. जखमी भुसारे यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना नांदेड येथे हलिवण्यात आले. याबाबत भुसारे यांनी नांदेड पोलिसांना जबाब दिला असून त्यात आरोपी किरण उत्तम रगडे याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून दुकानात अंडे फोडले. याबाबत जाब विचाला असता शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा जबाब परभणी ग्रामीण पोलिसांना देण्यात आला. याबाबत भुसारे यांच्या फिर्यादीवरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.