टेम्पो-जीपच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

By मारोती जुंबडे | Updated: July 15, 2023 18:47 IST2023-07-15T18:47:03+5:302023-07-15T18:47:12+5:30

महातपुरी फाट्यावरील घटनेत एकाचा मृत्यू एक जखमी

One died on the spot in a head-on collision with a tempo-jeep | टेम्पो-जीपच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

टेम्पो-जीपच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

महातपुरी : गंगाखेड-परभणी महामार्गावरील महातपुरी फाट्याजवळ शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास टेम्पो-चारचाकी वाहनाच्या समोरासमोर धडक झाली. या अपघात एक ठार एक जण जखमी झाला आहे.

गंगाखेड-परभणी महामार्गावरून शनिवारी पहाटेच्या सुमारास गंगाखेड येथून परभणीकडे जीप (क्रमांक एम.एच २२ एएम ८८७६) जात होती. दरम्यान परभणीकडून गंगाखेडच्या दिशेने टेम्पो (क्रमांक एमएच २६ बीई ८५६५) येत असताना महातपुरी फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की  जीपमधील श्रीधर भानुदास पवार (६२ रा. भाग्य नगर, गंगाखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक साधू साबळे (३५, रा. धनेवाडी ता. पालम ह.मु. गंगाखेड ) हे जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती समजताच महातपुरी येथील पोलीस पाटील विजय चाफळे, धनंजय गिरी, काशिनाथ मुलगीर, शेख इस्माईल आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून परभणी येथे हलविले. सोनपेठ पोलिस ठाण्याचे पोउपनि अमर केंद्रे, पोउपनि मंचकराव फड, जमादार शिवाजी जाधव, पो.शि. अमोल जगताप, महामार्ग वाहतूक शाखेचे शाम काळे, संजय पुरी, सुरेश टाकरस आदी घटनास्थळी आल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने अपघाग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत श्रीधर पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: One died on the spot in a head-on collision with a tempo-jeep