बैलगाडीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST2021-01-13T04:41:23+5:302021-01-13T04:41:23+5:30

बाभळगाव येथील योगेश नारायण लव्हाळे (२४) हे ६ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास बाभळगाव फाट्यावरून गावाकडे येथे असताना ...

One died in a collision with a bullock cart | बैलगाडीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

बैलगाडीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

बाभळगाव येथील योगेश नारायण लव्हाळे (२४) हे ६ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास बाभळगाव फाट्यावरून गावाकडे येथे असताना त्यांनी त्यांची एमएच २२ एसी २७८५ क्रमांकाची दुचाकी भरघाव वेगाने चालवून गावातील लिंबाजी कोरडे यांच्या बैलगाडीस जोराची धडक दिली. या अपघातात योगेश लव्हाळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने बाभळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपसाणीअंती डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत मयताचा चुलक भाऊ तुकाराम शिवाजी लव्हाळे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून भरघाव वेगाने वाहन चालवून व बैलगाडीस धडक देऊन स्वत:च्या मृत्यूृस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: One died in a collision with a bullock cart