क्रिकेट खेळण्यावरून एकाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST2021-01-13T04:41:21+5:302021-01-13T04:41:21+5:30

परभणी शहरातील हडको भागातील अभय हरिभाऊ ढेंबरे हे महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ...

One broke his head while playing cricket | क्रिकेट खेळण्यावरून एकाचे डोके फोडले

क्रिकेट खेळण्यावरून एकाचे डोके फोडले

परभणी शहरातील हडको भागातील अभय हरिभाऊ ढेंबरे हे महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ते महावितरण कार्यालयासमोरून रस्त्याने जात असताना महावितरण कार्यालयाच्या मैदानावर नेहमी क्रिकेट खेळणारा अनिकेत खंदारे हा तेथे आला. त्यावेळी ढेंबरे यांनी खंदारे यास तू ऑफिसच्या मैदानावर नेहमी क्रिकेट का खेळतोस, असे विचारले. तेव्हा खंदारे हा आपण मैदानावर नेहमी क्रिकेट खेळणार, तू काय करतोस, असे म्हणाला व शिवीगाळ करू लागला. त्याला शिवीगाळ करू नको म्हणत असताना खंदारे याने पळत जाऊन एक काठी आणली व ढेंबरे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. याबाबत ढेंबरे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनिकेत खंदारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One broke his head while playing cricket