परभणीत धारदार शस्त्रांसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:58 IST2019-02-13T00:57:25+5:302019-02-13T00:58:02+5:30

शहरातील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये तीन धारदार शस्त्रांसह एका आरोपीस पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.

One arrested with Parbhani cut sharp weapons | परभणीत धारदार शस्त्रांसह एकास अटक

परभणीत धारदार शस्त्रांसह एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये तीन धारदार शस्त्रांसह एका आरोपीस पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.
या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परभणीतील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये एम.एच.०६ -व्ही.एन. २६८० या कारमधील एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. यावेळी सदरील कारची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये ३ धारदार खंजीर आढळून आले. तसेच दोन मोबाईलही यावेळी आढळून आले. शस्त्र घेऊन हा आरोपी ऊरुसामध्ये का आला होता, त्याने शस्त्र कोणत्या उद्देशाने बाळगले, या मुद्यांवर स्थानिक गुन्हा शाखा आणि कोतवाली पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, ३ शस्त्रांसह दोन लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून कोतवाली पोलीस ठाण्यात हत्यारबंदी कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, गोपी सोनेत, हवालदार सुरेश डोंगरे, किशोर भूमकर, भगवान भुसारे, दिलावर पठाण, यशवंत वाघमारे, किशोर चव्हाण, सीमा चाटे, उमा पाटील, चोपडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: One arrested with Parbhani cut sharp weapons