दीड लाख बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:14+5:302021-02-05T06:04:14+5:30

परभणी : जिल्ह्यात रविवारी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत पथकाने १ लाख ४८ हजार ७३३ बालकांना पोलिओ ...

One and a half lakh children get polio dose | दीड लाख बालकांना पोलिओ डोस

दीड लाख बालकांना पोलिओ डोस

परभणी : जिल्ह्यात रविवारी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत पथकाने १ लाख ४८ हजार ७३३ बालकांना पोलिओ डोस दिला असून, उद्दिष्टाच्या तुलनेत ९४.११ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयात या मोहिमेचा प्रारंभ झाला. या प्रसंगी डॉ. किशोर सुरवसे, डॉ. प्रकाश डाके, डॉ. जिक्रे, डॉ सुदेवाड, अलका आखाडे, सुजाता कांबळे, चंदाराणी लेमाडे आदींची उपस्थिती होती, तर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते ग्रामीण भागातील पोलिओ लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी. देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ४३ बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी प्रशासनाने १ हजार ७५७ केंद्रांची निर्मिती केली होती. ३ हजार ९४२ कर्मचारी या कामी नियुक्त करण्यात आले होते. दिवसभरात या लसीकरण मोहिमेेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत १ लाख १५ हजार ६०० बालकांना पोलिओ लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख १२ हजार ३१८ बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत ४२ हजार ४४३ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३६ हजार ४१५ बालकांना लसीकरण करण्यात आले. मनपा कार्यालयांतर्गत झालेल्या लसीकरणाची माहिती रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाली नाही. मनपा वगळता १ लाख ५८ हजार ४३ बालकांपैकी १ लाख ४८ हजार ७३३ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे.

जि.प. आरोग्य विभागातून सर्वाधिक लसीकरण

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लसीकरणाचे ९७.१६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागातून १ हजार ४५२ केंद्रावरून १ लाख १२ हजार ३१८ बालकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १ लाख ९ हजार ९४१ बालके ५ वर्षांखालील आणि २ हजार ५६१ बालके ५ वर्षांवरील आहेत.

साडेआठ हजार व्हायलचा वापर

ग्रामीण भागात पोलिओ लसीकरण करण्यासाठी ८ हजार ५७४ व्हायलचा वापर करण्यात आला. १ हजार ११९ व्हायल परत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ८४४ व्हायलचा अर्धवट वापर झाला आहे.

Web Title: One and a half lakh children get polio dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.