बघताबघता उभी ओमिनी गाडी आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 17:37 IST2021-09-23T17:36:48+5:302021-09-23T17:37:19+5:30
बसस्थानक परिसरात एक ओमिनी गाडी बंद अवस्थेत उभी होती.

बघताबघता उभी ओमिनी गाडी आगीत भस्मसात
दैठणा ( परभणी ) : येथील बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका ओमिनी गाडीने अचानक पेट घेतला. बघताबघता गाडी संपूर्णत: जळून खाक झाली. ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
येथील बसस्थानक परिसरात एक ओमिनी गाडी बंद अवस्थेत उभी होती. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक या गाडीने पेट घेतला. गाडीतील वायरिंगमध्ये बिघाड होऊन ही घटना घडली. सुदैवाने यावेळी परिसरात कोणीही नसल्याने अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.