बापरे! सावरगाव ग्रामपंचायतचे रबरी शिक्के चोरीला
By मारोती जुंबडे | Updated: February 25, 2023 18:41 IST2023-02-25T18:40:39+5:302023-02-25T18:41:44+5:30
या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध संगणक परिचालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापरे! सावरगाव ग्रामपंचायतचे रबरी शिक्के चोरीला
परभणी: मानवत तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे रबरी शिक्के व काही शासकीय कागदपत्रे असलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध संगणक परिचालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवत तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायत संगणक परिचालक म्हणून नोकरी असलेले गजानन काशिनाथराव घाटूळ हे काही खाजगी कामानिमित्त मानवत शहरात आले होते. त्यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच २२ एएच ७८०३ च्या डिक्कीत ग्रामपंचायतचे रबरी शिक्के व काही शासकीय, खाजगी कागदपत्रे ठेवले होते. ही दुचाकी मानवत शहरातील एका खाजगी दुकानासमोर लावली होती. त्यानंतर गजानन घाटूळ हे संबधित दुकानदारांशी बोलून बाहेर आले. मात्र त्यांची दुचाकी दुकानासमोर दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी परिसरात शोधा- शोध सुरू केली.
परंत, त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी २३ फेब्रूवारी रोजी घाटूळ यांनी मानवत शहरातील पोलीस ठाणे गाठून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले रबरी शिक्के व काही शासकीय कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केलीची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.