जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:24 IST2021-02-26T04:24:00+5:302021-02-26T04:24:00+5:30
परभणी: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून गुरुवारी ४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका ...

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली
परभणी: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून गुरुवारी ४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
मागील अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. रुग्णांची संख्या लक्षणीय घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र दोन आठवड्यांपासून परिस्थिती बदलली आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. मागच्या दोन दिवसांपासून तर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी ५५ तर गुरुवारी ४१ नवीन रुग्ण आढळले. आरोग्य विभागाला ९८० नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ७९७ अहवालामध्ये २० आणि रॅपिड टेस्टच्या १८३ अहवालांमध्ये २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याच प्रमाणे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१५ रुग्ण नोंद झाले असून त्यापैकी ७ हजार ८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या २६४ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४३ तर खासगी रुग्णालयामध्ये ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. १७३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
परभणी तालुक्यात २९ रुग्ण
२५ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या ४१ रुग्णांमध्ये परभणी तालुक्यातील २९ रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यात ४, सेलू, पूर्णा आणि सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी २ तर पाथरी तालुक्यात १रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यातील एका रुग्णाची परभणीत नोंद घेण्यात आली आहे.