आता महाबळेश्वर सोडा,परभणीला चला; तापमान पोहोचले ४ अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:51 IST2024-12-15T11:50:33+5:302024-12-15T11:51:01+5:30

दोन दिवसापासून जिल्ह्यात हुडहुडी 

Now leave Mahabaleshwar, go to Parbhani; Temperature reaches 4 degrees | आता महाबळेश्वर सोडा,परभणीला चला; तापमान पोहोचले ४ अंशावर

आता महाबळेश्वर सोडा,परभणीला चला; तापमान पोहोचले ४ अंशावर

मारोती जुंबडे 

परभणी :
जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता. मात्र रविवारी त्यात आणखी घसरण होऊन पारा ४.६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने परभणीकर गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे आता महाबळेश्वर पेक्षा परभणीचे तापमान रविवारी गारठले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे. दोन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता. मात्र रविवारी त्यात जवळपास ३ अंशांनी घसरून ४.६ अंशावर पोहोचला. त्यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.

आठवडाभरात १० अंशांची झाली घट

 मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मात्र सोमवारी जिल्ह्यातील पारा १४ अंशांवर होते. ते थेट रविवारी पारा १० अंशांनी घसरून ४.६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.  

मागील सात दिवसातील तापमानातील चढउतार

सोमवार १४.०
मंगळवार १२.९
बुधवार १०.५
गुरुवार ८.४
शुक्रवार ८.५
शनिवार ७.८
रविवार ४.६

Web Title: Now leave Mahabaleshwar, go to Parbhani; Temperature reaches 4 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.