शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जमीन नावावर करूनही नोकरी दिली नाही; संस्थाचालकाच्या फसवणुकीने तरुणाची शाळेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 7:31 PM

तरुणाला आणि त्याच्या पत्नीला शाळेत नोकरीवर लावण्याचे दिले आमिष

ठळक मुद्देस्वतःची जमीन दिली संस्थेच्या शाळेसाठी 2006 पासून केली फसवणूक

पालम (परभणी ) : संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने शाळेतच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना पालम तालुक्यातील शेखराजूर येथील अंध व निवासी मूकबधिर शाळेत आज सकाळी उघडकीस आली. मृताच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली असून या प्रकरणी संस्थाचालकाविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण ऊर्फ लक्ष्मण किसनराव पवार ( 37) असे मृताचे नाव आहे. नांदेड येथील संस्थाचालक विठ्ठल संभाजी गुट्टे यांची शेखराजूर येथे अंध व मूकबधिर शाळा आहे. त्यावर नारायण पवार यांना सेवक व त्यांची पत्नी स्वाती पवार ( 32) यांना स्वयंपाकी म्हणून नोकरीवर घेण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात पवार यांनी स्वतःची दीड एकर जमीन शाळेसाठी दान दिली. यानंतरही ठरल्याप्रमाणे गुट्टे यांनी पवार दांपत्यास नोकरी दिली नाही. दरम्यान, त्याची तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. म्हणून पवार दडपणाखाली वावरत होते. याच विवंचनेत असताना आज सकाळी पवार यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयताची पत्नी स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक विठ्ठल गुट्टे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.

हेही वाचा - विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

सुसाईड नोट मधील मजकूरमयत पवार यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात "मी नारायण पवार आत्महत्या करीत आहे. कारण विठ्ठल संभाजी गुट्टे, या संस्थाचालकाने मला नोकरीला लावतो, असे म्हणून 2006 मध्ये माझी दीड एकर जमीन घेतली आणि मला नोकरीला लावले नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आणली, माझी जमीन शासनाने परत मिळवून द्यावी, ही माझी शेवटची विनंती", या आशयाचा मजकूर आढळला आहे.

हेही वाचा - हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी