शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपाच्या महापौरपदासाठी उद्धवसेनेच्या पाच जणांचे नामनिर्देशन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:32 IST

अर्ज सादर करण्यासाठी आजचा दिवस, उपमहापौर पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

- राजन मंगरूळकर

परभणी : महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी मंगळवार हा दिवस निश्चित केला आहे. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत महापौर पदासाठी उद्धव सेनेच्या वतीने एकूण पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. उपमहापौर पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. 

परभणी महापालिकेच्या एकूण ६५ जागांपैकी उद्धव सेनेला २५, काँग्रेस १२, भाजप १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ११, जनसुराज्य शक्ती ३, यशवंत सेना १, अपक्ष १ असे संख्याबळ पक्षनिहाय आहे. यामध्ये उद्धवसेना आणि काँग्रेस यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी उद्धवसेना तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून अर्ज भरले जाणार आहेत. 

मंगळवारी प्राप्त अर्ज उद्धवसेनेकडून गटनेते दिलीप सिंह ठाकुर, माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान, नगरसेवक श्याम खोबे, सय्यद इकबाल, शरफुद्दीन सिद्दिकी यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशक पत्र दाखल केले आहेत. 

राष्ट्रवादी, भाजप यांच्याकडून दुपारी अर्ज सादर होणार महापौर पदासाठी उद्धव सेनेने पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  अद्याप उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेदवार दाखल झाले नाहीत. तर राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही सदस्यांनी अर्ज खरेदी केली आहे. त्याच्याकडून दुपारी दोन वाजेनंतर अर्ज भरले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या निवडणुकीच्या लढतीचे अंतिम चित्र सायंकाळी सहा वाजता अर्ज सादरीकरणानंतर स्पष्ट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena (UBT) fields five for Parbhani mayor post.

Web Summary : Five Shiv Sena (UBT) candidates nominated for Parbhani Municipal Corporation mayoral election. Congress likely to contest Deputy Mayor. NCP and BJP expected to file nominations later. Election outcome clearer after 6 PM.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६parabhaniपरभणी