शहरातील एकूण कोविड केअर सेंटर - ३
या सेंटर्समध्ये सध्या दाखल रुग्ण - ४१
अशा आहेत जेवण मिळण्याच्या वेळा
कल्याण मंडपम : ८.३० वाजता नाष्टा, दोन वाजता जेवण, रात्री ८ ते ९ च्या दरम्यान जेवण
अक्षदा कोविड सेंटर : ८.३० वाजता नाष्टा, २.३० वाजता जेवण, रात्री ८ ते ८.३० च्या मध्ये जेवण
रेणुका कोविड सेंटर : ८.३० वाजता नाष्टा, २.३० वाजता जेवण, रात्री ८ ते ९ च्या मध्ये जेवण
चहा, काढ्यासाठी रेणुका सेंटरला मशीन
शहरातील रेणुका कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना दिवसभरात चहा, काॅफी, काढा घेण्यासाठी वेगवेगळ्या मशीन बसविण्यात आल्या आहेत. येथे पाहिजे तेव्हा रुग्ण चहा, काढा घेऊ शकतात.
नाष्टा, जेवण चांगले
शहरातील तीन कोविड केअर सेंटरमध्ये मिळणारे जेवण, नाष्टा चांगल्या दर्जाचे आहे. परंतु, बऱ्याच वेळा ते जेवण, नाष्टा ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा येते. यासाठी नियोजित केलेल्या वेळी जेवणाचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे.
रेणुका केअर सेंटर सध्या बंद
शहरातील तीन केअर सेंटरपैकी रेणुका केअर सेंटर सध्या रुग्णसंख्या घटल्याने बंद आहे, तर अक्षदा येथे केवळ २१ आणि कल्याण मंडपम येथे २० रुग्ण उपचार घेत आहेत.