नूतनने विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:39+5:302021-02-05T06:05:39+5:30
सेलू : नूतन महाविद्यालयाने शहरासह ग्रामीण परिसरातील अनेक पिढ्या घडविण्याचे काम केले. केवळ शिक्षणच नव्हे; तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे ...

नूतनने विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविले
सेलू : नूतन महाविद्यालयाने शहरासह ग्रामीण परिसरातील अनेक पिढ्या घडविण्याचे काम केले. केवळ शिक्षणच नव्हे; तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम नूतन महाविद्यालयाने केले असल्याचे प्रतिपादन डाॅ. संतोष नेवपूरकर यांनी ३० जानेवारी रोजी सभागृहात आयोजित गुणवत्ता सन्मान पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले. यावेळी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गणेश वैजूडकर, प्रा. मधुकर घुगे, त्र्यंबक बापू बोराडे, उपप्राचार्य डाॅ. एम. एस. शिंदे, डॉ. यु. सी राठोड, प्रा. विनायक टेंगसे, डॉ. राजाराम झोडगे, प्रा. नागेश कान्हेकर, डॉ. कीर्ती निरालवाड आदींची उपस्थिती होती. केवळ शिक्षण न घेता विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणारे शिक्षण नूतन महाविद्यालयातून मिळत आहे. गुणवत्तेबरोबरच आत्मविश्वास दृढ करण्याचे काम या विद्यालयातून केले जात असल्याचे नेवपूरकर म्हणाले. यावेळी गणेश वैजूडकर, प्रा. मधुकर घुगे, तर विद्यार्थी आयोध्या खोसे व हिमांशु वाकोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डाॅ. राजाराम झोडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शिवराज घुलेश्वर यांनी केले. आभार प्रा. नागेश कान्हेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डाॅ. भागवत कुमठेकर, प्रा. एस. एन. बिरादार, प्रा. ए. जी. उंडेगावकर, प्रा. पंकज सोनी, विठ्ठल वाघमारे आदींनी प्रयत्न केले.