शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:50 IST

खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली.

ठळक मुद्देपंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही.अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

जिंतूर :  तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले असताना आता शेतातील पाण्याचा निचरा झाला नसल्याने रबी पेरण्यांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. पेरण्या लांबून रबी हंगामातही नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात  झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. खरिपाची पिके बहरात होती. पिके ऐन काढणीला आली असतानाच तालुक्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्‌ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली. मात्र पंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही. जमिनीचा वापसाही झाला नाही. अशा परिस्थितीत पेरण्या करायच्या कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या असला तरी उत्पन्न  निघेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकंदर शेत जमिनीतील पाण्याचा वापसा झाला नसल्याने पेरण्या लांबणीवर पडत आहेत. सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या या तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या शेतात ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे. पाणी साचलेले असल्याने एक महिना वापसा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रबी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  

बियाणांची जुळवाजुळवशेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे येत आहेत. सुरुवातीला सोयाबीनचे बोगस बियाणे, त्यानंतर अतिवृष्टी, कापसावर पडलेला रोग या संकटामुळे उत्पादनात घट झाली आहे. आता रबी पेरण्यांचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खतांसाठी पैशाची जुळवा जुळव केली आहे. मागील हंगामातील नुकसान लक्षात घेता बियाणांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

१ टक्का क्षेत्रावर पेरणीतालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. रबी हंगामासाठी ४५ हजार हेक्टर क्षेत्र राखीव आहे. रबी हंगामात केवळ एक टक्का  क्षेत्रावर आतापर्यत  पेरणी झाली आहे. नदी काठावरील ५० ते ६० गावांमध्ये वाफसा झाला नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणीRainपाऊस