मानवत बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:42+5:302021-02-15T04:16:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील हत्तरवाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, ...

मानवत बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील हत्तरवाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, रितेश काळे, तालुकाध्यक्ष संतोष लाडाने, युवा तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे, माजी नगरसेवक डॉ. लहू सोळंके, हबीब भडके, शहराध्यक्ष शेख जुबेर, गजानन घाटूळ, सूरज काकडे, सचिन पठाडे उपस्थित होते. यावेळी बोलताना बाबाजानी दुर्रानी यांनी पक्षाच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतींना आगामी काळात विकासकामासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. तसेच आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला, तर काही सरपंच आणि सदस्य यांचा पक्ष प्रवेश झाला.
महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाढणार कुरबुर
राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू होती. तसा प्रयत्न राज्यस्तरावरून सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून येत आहेत. मात्र आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांमध्ये कुरबुर वाढणार असल्याचे दिसून येत आहे.