लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST2021-05-19T04:17:47+5:302021-05-19T04:17:47+5:30

कोरोनाच्या पहिला लाटेत नोव्हेंबर महिन्यापर्यंत संचारबंदी होती. दोन ते तीन महिन्याच्या सवलतीनंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून संचारबंदी आणि कोरोनाचे संकट ...

My mother-in-law is happy for Leki's Mahera ..... | लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....

कोरोनाच्या पहिला लाटेत नोव्हेंबर महिन्यापर्यंत संचारबंदी होती. दोन ते तीन महिन्याच्या सवलतीनंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून संचारबंदी आणि कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे मागच्या दोन वर्षांपासून लेकींना त्यांच्या माहेरी जाता आले नाही. वाहतूक सेवा ठप्प असणे, कोरोनाचा संसर्ग वाढणे यासारख्या कारणांमुळे लेकींचा माहेरचा प्रवास ठप्प झाला आहे. अशीच अवस्था लहान मुलांचीही झाली असून, मुलांना मामाचे गाव दूर झाले आहे. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचे संकट संपते आणि माहेरी जाते, अशी अवस्था विवाहितांची झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मातांनाही आपल्या मुलींच्या भेटीची ओढ लागली आहे.

गेल्या वर्षीपासून मुलीची भेट नाही. आता उन्हाळ्यात मुलीला नातवांसह रसाळीकरिता माहेरी बोलावले होते; परंतु कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढल्यामुळे सासरची मंडळी मुलीला पाठवत नाहीत. त्यातच संचारबंदीत बससेवा बंद असल्यामुळे मलाही मुलीकडे भेटण्यासाठी जाता येत नाही. उन्हाळ्यात मुलींना बघून बोलण्याच्या सुखद क्षणावर कोरोनाने विरजण टाकले. पण आम्ही मोबाईलवर संवाद साधतो.

शिवकांता जनार्दन केदारी,

चारठाणा, ता. जिंतूर.

यावर्षीच मुलीचे लग्न झाले. तिला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. पण कोरोनामुळे तिला माहेरी येता येत नाही. असे असले तरी या परिस्थितीत आम्ही मोबाईलवर, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत समाधान मानत आहोत.

शारदा बबन भोगावकर,

देऊळगाव गात, ता. सेलू.

मुलीला सण किंवा कार्यक्रमासाठी माहेरी बोलावले होते; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सासरच्या मंडळीची इच्छा असूनही त्यांनी मुलीला पाठवले नाही. कोरोनाने अशी वाईट परिस्थिती आणली. कोरोना लवकर संपावा.

यमुना भारत धरफडे,

माहेरच्या मंडळीला भेटण्याची गेल्या दीड वर्षापासून आस लागली आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने माहेरी जाणे शक्य होत नाही. कोरोनाची भीती वाटत असल्याने शेवटी मोबाईलवरून संवाद साधत माहेरकडील समाचार जाणून घेत आहे.

आशामती विष्णू काटकर,

वरुड नृसिंह, ता. जिंतूर.

संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. माहेरच्या मंडळीने रसाळी जेवणाचे निमंत्रण दिले. मुलांसह माहेरी जाण्याचा बेत होता. पण कोरोनाची भीती आणि बससेवा बंद असल्याने माहेरी जाता येत नाही.

संतोषी संजय वाशिंबे,

समतानगर, सेलू

आपल्या कुटुंबाची व उतारवयातील सासू, सासरे यांची काळजी म्हणून माहेराला जाणे टाळले आहे; परंतु कोरोनामुळे आपली मायेची माणसे दुरावली जात आहेत. किमान उन्हाळ्याचे चार दिवस एकत्र घालवण्याचा आनंद हिरावला गेला आहे.

अरुणा भुजंग थोरे,

गणेशनगर,सेलू.

दरवर्षी उन्हाळी सुटीत मामाच्या गावाला जात होतो. पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे जाता आले नाही. मामाच्या गावची मज्जा वेगळीच असते. पण हा आनंद कोरोनाने हिसकावून घेतला.

हर्षद नागनाथ साळेगावकर,

देवगावफाटा, ता.सेलू.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. घराबाहेर पडणेही बंद आहे. त्यामुळे मामाच्या गावाला जाता येत नाही. कोरोना संपताच मामाच्या गावाला जाणार आहे. मागील दीड वर्षापासून मामाची भेट दुर्मिळ झाली आहे.

ओम मल्लिकार्जुन भोगावकर,

सह्याद्री नगर, सेलू.

मामाच्या गावी जाऊन मजा करणे यासारखा आनंद दुसरा कशात नाही. पण या आनंदावर कोरोनाने पाणी फेरले आहे. मामाची मुले व मित्र कंपनी वाट पाहत आहेत. कोरोना कधी संपतो, याची मी वाट पाहत आहे.

प्रज्वल प्रकाश थोरात,

पारीख कॉलनी, सेलू.

वालूर, ता. सेलू

Web Title: My mother-in-law is happy for Leki's Mahera .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.