३२ केंद्रांवर होणार एमपीएससीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:18+5:302021-04-08T04:17:18+5:30
परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ एप्रिल रोजी शहरातील ३२ केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार ...

३२ केंद्रांवर होणार एमपीएससीची परीक्षा
परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ एप्रिल रोजी शहरातील ३२ केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने या परीक्षेची तयारी आता सुरू केली आहे. परीक्षेसाठी लागणाऱ्या उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढलेला संसर्ग लक्षात घेता या सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या कर्मचाऱ्यांसाठी ७ आणि ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सिटी क्लब मैदान येथे आरटीपीसीआर तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ७ एप्रिल रोजी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा केंद्रप्रमुख डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिल्या आहेत.