सोनपेठकरांचे खड्ड्यात बसून आंदोलन; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 16:16 IST2017-12-18T16:16:14+5:302017-12-18T16:16:42+5:30
सोनपेठ तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी आज सोनपेठकरांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले.

सोनपेठकरांचे खड्ड्यात बसून आंदोलन; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची केली मागणी
सोनपेठ (परभणी): तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी आज सोनपेठकरांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले. २ वर्षांपूर्वीसुद्धा नागरिकांनी रस्त्यासाठी 59 दिवस धरणे आंदोलन केले होते. परंतु त्यावेळेसही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही़ सर्व रस्ते खड्डेमुक्त करू, असे जाहीर केले होते. या घोषणेनंतर तालुक्यातील नागरिकांना येथील रस्ते खड्डेमुक्त होतील असे वाटले होते. मात्र, १५ डिसेंबरनंतरही तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यामुळे हि खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी आज नागरिकांनी सोनपेठ-गंगाखेड रोडवरील खड्ड्यात बसून आंदोलन केले. दरम्यान २ वर्षांपूर्वीसुद्धा नागरिकांनी रस्त्यासाठी 59 दिवस धरणे आंदोलन केले होते. परंतु त्यावेळेसही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले होते.
यावेळी सुधिर बिंदू, गणेश पाटील, गुलाबराव ढाकणे, माधव जाधव, रामप्रसाद यादव, मारोती रंजवे, अशोक तिरमले, सोमनाथ नागुरे, राधेश्याम वर्मा, कृष्णा पिंगळे, सय्यद खदिर, रविंद्र देशमुख, सिद्धेश्वर गिरी, शिवमल्हार वाघे यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.