परभणीत अन्यायग्रस्त लोककलावंतांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:47 IST2019-07-08T23:47:18+5:302019-07-08T23:47:43+5:30
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता दिंडीसाठी घेतलेल्या चाचणीत अपात्र ठरलेल्या संचाला पाठविण्यात आल्याने याविरूद्ध लोककलावंतांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़

परभणीत अन्यायग्रस्त लोककलावंतांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता दिंडीसाठी घेतलेल्या चाचणीत अपात्र ठरलेल्या संचाला पाठविण्यात आल्याने याविरूद्ध लोककलावंतांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़
शासनाच्या वतीने घेतलेल्या निवड चाचणीमध्ये लोकजागर प्रतिष्ठान हे कलापथक प्रथम आले असतानाही त्यास डावलण्यात आले आहे़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला़ तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, पात्र संचाच्या कलावंतांना सीईओंच्या पगारातून मानधन द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात शाहीर नामदेव लहाडे, भारत मुंजे, रमेश काळे, नरेंद्र कांबळे, गंगाधर लहाडे, भास्कर कांबळे, सुनिता जाधव, भगवान वाघमारे, किशनराव धबाले, शिवाजी सुगंधे, मदनराव कदम, विश्वनाथ कदम, नामदेव सुगंधे, सोपान डुमणे, सखाराम सुगंधे, सोपान जाधव, सुनिता शिवभगत, विठ्ठल पैंजणे, भगवान घोडके, भारत देवरे, उत्तम मांडे, मुरलीधर बडगुजर, लिंबाजी पंडित, शुभम गोंधळी, मदन नरवाडे, काशीनाथ आठवले, रंगनाथ सुगंधे, गोविंद कदम, गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला़
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
४लोककलावंतांवर अधिकाºयांकडून अन्याय केला जात आहे़ मनमानी पद्धतीने कारभार करणाºया या अधिकाºयांवर कारवाई करावी, तसेच अन्यायग्रस्त लोककलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी शाहीर नामदेव लहाडे यांनी केली़
४जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोक कलावंतांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा लहाडे यांनी यावेळी दिला़